पेनाच्या निबवर साकारले बाबासाहेब

पेनाच्या निबवर साकारले बाबासाहेब

Published on

नेरूळ, ता. ७ (बातमीदार) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून कलाशिक्षक नरेश लोहार यांनी पेनाच्या निबवर २X७ सेंटीमीटर आकारात डॉ. बाबासाहेबांचे चित्र रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली. या कामासाठी त्यांना नऊ मिनिटे २४ सेकंद इतका कमी कालावधी लागला आहे. यापूर्वी त्यांनी ज्वारीच्या भाकरीवर, पिंपळाच्या पानावर आणि चार बोटांच्या साह्याने चित्र रेखाटले होते. तसेच, ३,२२१ वह्या-पुस्तकाच्या माध्यमातून ५०X८० फुटांमध्ये बाबासाहेबांचे कोलाज विद्यार्थ्यांच्या मदतीने साकारले होते. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयमाला कदम, एम. डी. कदम, डॉ. विलासराव कदम, प्राचार्य बेल्लम आर. टी., उपप्राचार्य आर. एच. कदम यांनी कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com