समतामूलक विचारांच्या प्रचाराची जबाबदारी आपली

समतामूलक विचारांच्या प्रचाराची जबाबदारी आपली

Published on

समतामूलक विचारांच्या प्रचाराची जबाबदारी आपली : आयुक्त सौरव राव
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिले नाही तर सामाजिक समता, बंधुता हे विचारही दिले आहेत. आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीने प्रसारित करण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कक्षात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळेस ते बोलत होते.

पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, बिरारे, गोदापुरे आदी उपस्थित होते. यावेळी सौरव राव यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजाने चालावे, यासाठी पत्रकारांची जबाबदारी मोठी आहे, असे सांगितले.

ठाणे महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोर्ट नाका येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिवादन केले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक उपस्थित होते.

ठाणे जिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील सभागृहात उपमुख्य कार्यकारी (सा. प्र) अविनाश फडतरे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. समीर तोडणकर, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com