नवी मुंबईत डॉ. बाबासाहेबांना आदरांजली

नवी मुंबईत डॉ. बाबासाहेबांना आदरांजली

Published on

तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबईतील सर्व राजकीय पक्ष, विविध बौद्ध धार्मिक संस्था तसेच, डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुयायींच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिननिमित्त अभिवादन करण्यात आले.
नवी मुंबईतील रबाळे-ऐरोली परिसरात मातोश्री अनुसया सोनावणे चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला रबाळे-ऐरोली परिसरात डॉ. आंबेडकर अनुयायींनी भव्य कँडल मार्च काढून विनम्र अभिवादन केले. आंबेडकर नगर बुद्ध विहार, गौतम नगर येथील कलिंगा बुद्ध विहार, निब्बान टेकडी बुद्ध विहार, भीम नगर आणि क्रांती चौकातून पंचशील विहारात त्रिशरण आणि पंचशील गाथा घेऊन कँडल मार्चचा समारोप करण्यात आला. कांशीराम हिंदी विद्यालय आणि छत्रपती शाहू महाराज विद्यालयात आमदार गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे अभिवादन करण्यात आले. या वेळी सर्व पक्षातील आंबेडकरी अनुयायी, माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध धार्मिक संस्था पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशी येथे बुद्ध प्रतिष्ठान, स्वराज्य पक्ष यांच्या वतीने नेरूळ सेक्टर ८ येथील एल मार्केटमध्ये उपाध्यक्ष स्वप्नील घोलप, उदय साळवी आणि अन्य भीम अनुयायींनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. सीबीडी आयकर कॉलनी येथील धम्मदीप सामाजिक संस्था यांच्या वतीने विठ्ठल गायकवाड, आत्माराम मागाडे, बी. के. पवार, भीमसेन तपासे, किरण जाधव यांच्या पुढाकाराने कँडल मार्च काढण्यात आला. या वेळी सिबीडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदेश रेवळे यांनीही उपस्थित राहून महामानवास अभिवादन केले. जुईनगर सेक्टर २३ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमधील त्रिरत्न बुद्ध विहार, मूलगंध कुटी विहार, नेरूळ येथील कपिलवास्तू बुद्ध विहार येथे अभिवादन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com