करंजाडे ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव संमत
कामोठे, ता. ७ (बातमीदार) : पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये दारूबंदीचा ठराव लागू करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने शुक्रवारी मंजूर केला. ग्रामपंचायतीचे सामाजिक स्वास्थ अबाधित राखण्यासाठी तत्काळ दारूबंदी करण्याचे निवेदन सरपंच मंगेश शेलार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
करंजाडे ग्रामपंचायत क्षेत्रात दारू विक्रीच्या दुकानांत वाढ होत आहे. येथील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याने अनेक घरांतील वातावरण बिघडत चालले आहे. महिलांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने गावातील दारूची दुकाने बंद करण्याची मागणी महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी केली आहे. ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावर सेक्टर तीनमधील दुधे विटेवरी या इमारतीच्या एका गाळ्यात सुरू असलेल्या वाईन शॉपमधून दारू विकत घेऊन मद्यपी रस्त्यावरच दारू पित असल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे. मद्यपींमुळे भांडणे, हाणामारी यासारखे प्रकार दररोज घडत आहेत. परिसरात भुरट्या चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे. वाईन शॉपच्या हाकेच्या अंतरावर शाळा आहे. शाळकरी मुलांवर मद्यविक्रीचा, मद्यपींच्या गैरवर्तनाचा दुष्परिणाम होण्याची भीती पालक व्यक्त करत आहेत. शुक्रवारी (ता. ६) पार पडलेल्या ग्रामसभेत या विषयावर चर्चा करण्यात आली. या सभेत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार ग्रामपंचायत हद्दीमध्ये तातडीने दारूबंदी लागू करण्याची कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
-------------------
व्यसनामुळे तरुण पिढी भरकटत चालली आहे. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने सर्वानुमते दारूबंदीचा ठराव संमत केला आहे. प्रशासनाने उचित कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार आहे.
- मंगेश शेलार, सरपंच, करंजाडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

