व्यावसायिकाला ३.८१ कोटींचा गंडा
व्यावसायिकाला ३.८१ कोटींचा गंडा
गुंतवणुकीच्या प्रलोभनाने फसवणुकीप्रकरणी त्रिकूटास अटक
अंधेरी, (ता. ७) ः चांगला परतावा देतो, असे सांगून शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून एका वृद्ध व्यावसायिकाची ३ कोटी ८१ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या त्रिकूटाला मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पेालिसांनी अटक केली. सतीश सूर्यनाथ यादव, विकास रामशंकर मौर्या आणि सचिन कृष्णचंद चौरसिया अशी या तिघांची नावे आहेत.
या तिघांना स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या कटाचा सतीश यादव हा मुख्य आरोपी असून, तोच ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. त्यांच्याच सांगण्यावरून त्याने एका बोगस कंपनीच्या नावाने बॅंकेत खाते उघडले होते. त्याच्याच बँक खात्यात सुमारे दीड कोटी रुपयांची रक्कम ट्रान्सफर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
७६ वर्षांचे तक्रारदार नितीन चुनीलाल दडिया हे ब्रिजकॅण्डी परिसरात राहतात. त्यांचा बजाज गाडीचे पार्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. जानेवारी महिन्यात त्यांना शेअरसंदर्भातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांना शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून चांगला परवाता देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून नितीन दडिया यांनी ३१ जानेवारी ते २९ मार्च २०२४ या कालावधीत विविध शेअरसाठी ३ कोटी ८१ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळत असल्याचे भासविण्यात आले होते; मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करता येत नव्हती. त्यासाठी त्यांच्याकडे ग्रुप ॲडमिनने आणखीन १ कोटी १९ लाखांची मागणी केली होती. संबंधित व्यक्तीकडून त्यांची फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांसह सायबर सेलच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार केली होती. गुन्हा दाखल होताच प्रभारी पोलिस निरीक्षक मौसमी पाटील यांच्या पथकातील मानसिंग वचकल, पोलिस शिपाई कैलास बाबरे, पोलिस हवालदार संदीपान खर्चे यांनी तपास सुरू केला होता. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी दिवा आणि मुंंब्रा येथून सतीश यादव आणि विकास मौर्या या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

