उटावली येथे मृदा संवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा

उटावली येथे मृदा संवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा

Published on

विक्रमगड (बातमीदार) : तालुक्यातील उटावली येथे जागतिक मृदा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सरपंच संगीता महाले यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायत सदस्य संदीप भोये, विलास भोये, महेश भुसारा, अजित ठाकरे, प्रमिला गोरखणे, आशा गवळी, पी. एस. सांबर व कृषी सहाय्यक राजेश बुंधे उपस्थित होते. मृदेचे महत्त्व, जमिनीची सुपीकता, सेंद्रीय खतांचा वापर याविषयी मार्गदर्शन कृषी अधिकारी यांनी सुनील पारधी केले. अकांक्षित तालुका कार्यक्रम समन्वयक शीतल भांगरे यांनी पंतप्रधान किसान, मृद आरोग्यपत्रिका माती परीक्षण, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे आदींबाबत मार्गदर्शन केले. मृदेचे आरोग्य, संवर्धन आणि रक्षण करण्याची सामूहिक प्रतिज्ञा पी. एस. सांबर यांनी घेतली. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com