परुळेकर महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान
कासा (बातमीदार) : तलासरी येथील परुळेकर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चिंचणीतील पी. एल. श्रॉफ महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर भोसले होते. तसेच, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एन. पवार, ग्रंथपाल डॉ. अर्जुन होन आणि सहाय्यक प्राध्यापक भास्कर गोतीस यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आपले मनोगत व्यक्त केले. तृतीय वर्ष कला विभागातील सोनाली खरात आणि इतर विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे गुणगौरव करणाऱ्या स्वयंरचित कविता सादर केल्या. डॉ. भोसले यांनी डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्यांवर प्रभावी भाष्य केले. त्यांनी आंबेडकर यांच्या आत्मचरित्रातील प्रसंग व समाजासाठी केलेल्या बलिदानाची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. या कार्यक्रमाला कला व वाणिज्य विभागातील १८० हून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

