शेकडो नागरिकांची महामानवाला मानवंदना
जव्हार (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जव्हार शहरातील आंबेडकर स्मारक येथे शुक्रवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता भारतीय बौद्ध महासभा शाखा जव्हार आणि शहरातील नागरिकांकडून महामानवाला मानवंदना देण्यात आली. या वेळी माजी आमदार सुनील भुसारा, विक्रमगड आमदार हरिश्चंद्र भोये, श्रीमंत महेंद्रसिंह दिग्विजय सिंह मुकणे, युवराज मार्तंडराव महेंद्र सिंह मुकणे, पोलिस निरीक्षक किशोर मानभाव, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पक्ष संघटनेचे पदाधिकारी अशा शेकडो नागरिकांनी अभिवादन करीत मानवंदना दिली. कार्यक्रमाच्या सुरुवात त्रिसरण पंचशील घेऊन करण्यात आली. या वेळी किशोर जाधव, राहुल शेवाळे, सागर बल्लाळ, विश्वास भरीत, अमोल बर्वे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पालघर जिल्हाध्यक्ष श्याम शिंदे, राजेश धात्रक, ज्येष्ठ नेते गोविंद बल्लाळ, उत्तम शेवाळे आणि कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर केदार यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

