पालिकेच्‍या अतिक्रमण विभागाच्या वतीने तोडक कारवाई

पालिकेच्‍या अतिक्रमण विभागाच्या वतीने तोडक कारवाई

Published on

पालिकेच्‍या अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई
पनवेल, ता. ७ (बातमीदार) ः पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागांतर्गत प्रभाग कार्यालयाकडून गेल्या काही दिवसांपासून हातगाड्यांवर तसेच अनधिकृत बांधलेल्या झोपड्या, दुकानांबाहेर अनधिकृतरीत्या ठेवलेल्या सामानावर आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार तोडक कारवाई करण्यात येत आहे. फुटपाथवर तसेच रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे महापालिकेच्या वतीने ही तोडक कारवाई करण्यात येत आहे.
शहरातील हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळे होत असल्याने कळंबोलीमध्ये सुमारे १२ हातगाड्यांवरती तोडक कारवाई करण्यात आली. तसेच पनवेल प्रभाग ‘ड’मधील उरण नाका येथील सात हातगाड्या जप्त करून तोडण्यात आल्या. अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यांवरून ये-जा करण्यास त्रास होत आहे. त्‍यामुळे मागील काही दिवसांपासून पनवेल महापालिकेकडे तक्रारी वाढल्या होत्या.
त्‍याअनुषंगाने आयुक्त मंगेश चितळे यांनी अतिक्रमणाबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश चारही प्रभाग कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार खारघर सेक्टर १२ येथे अनधिकृतरीत्या वसलेल्या झोपडपट्टीवरती तोडक कारवाई करण्यात आली. याबरोबरच पनवेलमध्ये लाइन आळीमध्ये दुकानदारांनी दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानावर जप्तीची कारवाई करण्यात आली. प्रभाग ‘क’ कामोठेमध्ये फुटपाथवरती दुकानदारांनी ठेवलेले दुकानाचे बोर्ड काढून नागरिकांना चालण्यासाठी रस्‍ता रिकामा करण्यात आला. प्रभाग ‘ब’ कळंबोलीमध्ये फुटपाथवरती अनधिकृतरीत्या उभारलेल्या सरबताच्‍या स्टॉल्सवर तोडक कारवाई करण्यात आली.
...................
महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांतील रस्त्यांवर तसेच फुटपाथवरती अनधिकृतरीत्या व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे. फेरीवाल्यांनी रस्त्यांवर अनधिकृत व्यवसाय करू नये अन्यथा येत्या काही दिवसांमध्ये अतिक्रमणांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात येईल.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com