रिल्सस्टारला समाज प्रबोधनाची शिक्षा
भाईंदर रेल्वे स्थानकात
रील बनवणाऱ्यांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : भाईंदर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर जीवघेणे व्हिडिओ बनवणाऱ्या ध्रुव दुबे, आयान अली, ऋषी कुमार, मोहम्मद तोयब शेख आणि भरत पुरोहित या तरुणांवर पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्यावर रेल्वे परिसरात बेकायदा व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी रेल्वे कायद्याच्या कलम १४७ आणि १४५ (ब) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५ (३)नुसार नोटिसा बजावल्या आहेत.
मुंबई सेंट्रलमधील नियंत्रण कक्षाला भाईंदर स्थानकात काही तरुण रुळांवर रील तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आरपीएफ अधिकारी रोहतास सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाईंदर आरपीएफच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. हे सर्व तरुण २० ते २४ वर्षे वयोगटातील असून, विविध उत्पादनांच्या जाहिरातींसाठी रील बनवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रेल्वे रुळांवर व्हिडिओ तयार करणे फौजदारी गुन्हा आहे, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
-----
प्रबोधनात्मक व्हिडिओ
तयार करण्याची शिक्षा
वसई रोड येथील न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपी तरुणांना रेल्वे रूळ ओलांडू नये आणि अशा प्रकारच्या जीवघेण्या कृती टाळाव्यात, याबाबत समाजप्रबोधन करणारे व्हिडिओ तयार करण्याची शिक्षा सुनावली आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे नियमांचे पालन करण्याचे संदेश असणार असून, ते पश्चिम रेल्वेच्या समाजमाध्यम खात्यावर अपलोड केले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

