डांबराच्या पुनर्वापरातून होणार रस्त्यांची दुरुस्ती
डांबराच्या पुनर्वापरातून
होणार रस्त्यांची दुरुस्ती
पालिकेकडून इन्फ्रारेड रिसायकलिंग यंत्र खरेदी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिका नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. आता डांबरी रस्त्यांसह सिमेंट- काँक्रीटच्या रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांसाठी नवीन प्रयोग केला जाणार आहे. डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी जुन्या वापरलेल्या डांबरावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका इन्फ्रारेड रिसायकलिंग यंत्र खरेदी करणार आहे.
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट- काँक्रीटच्या रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने विविध तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आता खड्डे बुजवण्यासाठी जुन्या वापरलेल्या डांबरावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. त्यासाठी इन्फ्रारेड रिसायकलिंग यंत्र खरेदी केले जाणार आहे. या यंत्राद्वारे खड्डे दुरुस्तीबरोबरच रूटिंग, तडे, तुटलेल्या कडा आदींची दुरुस्ती करता येते. या यंत्राच्या खरेदीसाठी जारी केलेल्या निविदेमध्ये प्रीती कन्स्ट्रक्शन कंपनीला यंत्र खरेदी आणि दोन वर्षांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सात कोटी १७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.
----
कसे काम करते?
या तंत्रज्ञानाद्वारे जुने पुनरुत्पादित केलेले हॉटमिक्स बीसी आणि नवे हॉटमिक्स बीसी हे इन्फ्रारेड किरणांद्वारे समान तापमानावर आणून एकजीव केले जातात. या यंत्राच्या साह्याने खड्डे बुजण्यासाठी लागणारे साहित्य, रस्ता सुरक्षा उपकरणे, कंपन पेल्ट कॉम्पॅक्टर या सर्वांना एकाच कंटेनरच्या छोट्या ट्रकमध्ये समाविष्ट केले जाईल. त्याद्वारे रस्तेदुरुस्ती केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

