वर्षभरात ३११ मुक्याजीवांना जीवदान

वर्षभरात ३११ मुक्याजीवांना जीवदान

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : आपत्ती परिस्थिती कधी कोणावर येईल, याचा काही नेम नाही. मग तो मनुष्यप्राणी असो वा मुकाजीव. अशाच ३११ मुक्या जीवांवर या वर्षातील ३३४ दिवसांत संकट आले होते. त्यांच्या मदतीला ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग धावून येत त्यांना संकटातून बाहेर काढत जीवदान दिले. आतापर्यंत १८७ प्राण्यांना, तर १२४ पक्ष्यांना हे जीवदान मिळाले आहे. गतवर्षभरात ४३९ मुक्या जीवांना जीवदान दिले आहे. यामध्ये २५३ प्राणी असून १८६ हे पक्षी आहेत. विशेषतः पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यात
त्यांना जीवदान देत मोलाचे कार्य करत माणुसकी जपण्याचा या विभागाने प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षामधील दूरध्वनी क्रमांक हा वर्षाच्या बारा महिने २४ तास खणखणत असतो. ‘अहो साहेब..., येथे झाड पडले किंवा अपघात झाला आहे. अन्यथा, साहेब उंच झाडाला किंवा विजेच्या खांब्याला कावळा, कबुतर, चिमणी अडकली असून ती सुटकेसाठी तिच्या जीवाचे रान करत आहे. नाल्यात कुत्रा अडकला आहे. मांजर बिल्डिंगच्या १५ किंवा त्याच्याही उंच सज्जावर अडकली आहे, असे फोन दररोज चालूच असतात. कुत्री-मांजरी, गुरे किंवा कावळा-कबुतर यांच्या येणाऱ्या तक्रारींची अन्य तक्रारींमध्ये नोंद केली जाते. अशा प्रकारे १ जानेवारीपासून ३० नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३११ तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये नोंदवल्या आहेत. यामध्ये १८७ प्राणी आणि १२४ पक्ष्यांसंदर्भात तक्रारी आहेत.

पहिल्या पाच महिन्यांत १६८ तक्रारींचा समावेश आहे. मानवी जीवाप्रमाणे मुका जीव ही तितकाच महत्त्वाचा आहे. या कक्षात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची नोंद केली जाते. प्रत्येक तक्रारीनुसार त्याबाबत घटनास्थळी जाऊन खातरजमा केली जाते. मुक्या जीवांना वेळप्रसंगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
- यासीन तडवी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे पालिका
............................................
तक्रारींचा तक्ता
महिने प्राणी पक्षी
जानेवारी २६ २१
फेब्रुवारी १९ ०८
मार्च ११ २५
एप्रिल १५ ११
मे १६ १६
जून २४ १३
जुलै १८ ११
ऑगस्ट १३ ०९
सप्टेंबर २० ०३
ऑक्टोबर १३ ०१
नोव्हेंबर १२ ०६
एकूण १८७ १२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com