विमानतळ परिसरातील झोपड्यांचा पुनर्विकास करणार

विमानतळ परिसरातील झोपड्यांचा पुनर्विकास करणार

विमानतळ परिसरातील झोपड्यांचा पुनर्विकास करणार विमानतळ परिसरातील झोपड्यांचा पुनर्विकास करणार

Published on

विमानतळ परिसरातील झोपड्यांचा पुनर्विकास करणार
कलिना विधानसभा ः आमदार संजय पोतनीस
बापू सुळे
सर्वसामान्य आणि उच्चभ्रू वस्ती असलेल्या कलिना विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे संजय पोतनीस यांनी बाजी मारली आहे. निवडणुका झाल्या, निकाल लागल्यानंतर त्यांनी आपले लक्ष्य आता मतदारसंघावर केंद्रित केले आहे. त्यानुसार येथील विमानतळ परिसरातील झोपड्यांबरोबरच मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास हा आपला मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मतदारसंघात कोणत्या प्रमुख समस्या असून, त्या कशा मार्गी लावणार?
- कलिना विधानसभेचा बहुतांश परिसर विमानतळाला लागून असल्याने ‘फनेल झोन’च्या निर्बंधामुळे पुनर्विकास रखडला आहे. दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टीत पायाभूत सुविधांचा अभाव, पावसाळ्यात मिठी नदीला येणाऱ्या पुराचे घरात घुसणारे पाणी, वाहतूक कोंडी अशा वेगवेगळ्या समस्या असून, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

‘फनेल झोन’चा काय विषय आहे?
विमानतळाला लागून असलेला परिसर हा फनेल झोनमध्ये येतो. त्यामुळे येथे जास्तीत जास्‍त तीनमजली इमारती उभारण्यास परवानगी असल्याने विकसक त्यामध्ये फारसे स्वारस्य दाखवत नाहीत. तसेच मोडकळीस आलेल्या सात मजली इमारतींचीही हीच समस्या आहे. त्यामुळे ‘फनेल झोन’मधील झोपड्या किंवा इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या विकसकाला इतरत्र जास्त टीडीआर देऊन हा प्रश्न सोडवता येऊ शकतो. त्यामुळे त्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करून येथील रहिवाशांना न्याय मिळवून देणार आहे.

झोपडपट्टीत पायाभूत सुविधांचा अभाव दिसतो?
विमानतळ परिसरात दाटीवाटीची झोपडपट्टी आहे. जागेअभावी रस्ते, पाणी, शौचालय अशा पायाभूत सुविधा देण्यावर मर्यादा येतात; मात्र पुनर्विकासानंतर हा प्रश्न मार्गी लागेल. तेथील रहिवाशांना कुर्ला प्रीमियर येथे स्थलांतर करण्यासाठी इमारती बांधल्या आहेत, पण राजकीय विरोधामुळे ते झालेले नाही. त्यामुळे सध्या येथील घरांची दुर्दशा झाली आहे. ती पुन्हा सुस्थितीत आणून झोपडीधारकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार.

प्रमुख आव्हाने काय?
- सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, एलबीएस मार्ग, कुर्ला डेपो, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होत असून ती कमी करणे.
- पावसाळ्यात एलबीएस मार्गावर निर्माण होणारी पूरस्थिती
- कलिना परिसरात एकही क्रीडा संकुल नाही. ते कोलावरी व्हिलेज आणि हयात हॉटेलनजीक व्हावे, यासाठी प्रयत्नशील
- मिठी रुंदीकरणातील गाळेधारक आणि झोपडीधारकांचे स्थलांतर, मोबदला मिळवून देणे
- एमएमआरडीए, पालिकेचे अपूर्ण प्रकल्प

मतदारांनी विरोधकांना का नाकारले?
या मतदारसंघात महायुतीने अमरजित सिंह यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते, मात्र ते तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचलेच नाहीत. केवळ निवडणुकीपुरते लोकांमध्ये जाणे मतदारांना रुचले नाही. पाच वर्षे काम करायला हवे. काम न करता प्रलोभनांवर मते मिळतील, हा समज फोल ठरला आहे. अमरजित यांच्या प्रचारात पक्षाच्या राज्याबाहेरील बड्या नेत्यांचा आणि सेलिब्रिटींचा वरचष्मा दिसून आला. पैसे, साडी वाटपाला मतदारांनी नाकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com