‘जहांगीर’मध्ये मंगळवारपासून ‘प्रफुल्ला अ रेट्रोस्पेक्टिव्ह‌’

‘जहांगीर’मध्ये मंगळवारपासून ‘प्रफुल्ला अ रेट्रोस्पेक्टिव्ह‌’
Published on

मुंबई, ता. ७ : जीवनाची शाश्वतता दर्शवणाऱ्या, अथांग, आध्यात्मिक, गूढ आणि आत्मिक समाधान देणाऱ्या जगप्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांनी साकारलेल्या ‘प्रफुल्ला अ रेट्रोस्पेक्टिव्ह‌’ या चित्रकृतींचे प्रदर्शन मंगळवार (ता. ११)पासून जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात येणार आहे.
प्रफुल्ला डहाणूकर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती व त्यांनी साकारलेल्या प्रदर्शनातील काही चित्रे अद्याप जगासमोर आलेली नाहीत. ते या प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना प्रथमच पाहावयास मिळणार आहेत. ‌या प्रदर्शनाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. १०) सायंकाळी ५ वाजता कला इतिहासकार, संशोधक डॉ. सरयू दोशी आणि कला इतिहासकार, लेखिका डॉ. फिरोजा गोदरेज यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मंगळवारपासून सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
प्रदर्शनाच्या निमित्ताने ११ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता ‌‘इकॉलॉजीज ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन: कलाकार प्रफुल्ला डहाणूकर‌’ या चर्चासत्राचे एशिया सोसायटीचे भारतीय केंद्र यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे. यात सविता आपटे, बेथ सिट्रॉन आणि गोपिका डहाणूकर यांचा सहभाग असणार आहे. चर्चासत्राच्या माध्यमातून डहाणूकर यांच्या कलाक्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेतला जाणार आहे.

आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून युवा कलाकारांना प्रोत्साहन
डहाणूकर यांच्या निधनानंतर त्यांचे पती दिलीप डहाणूकर यांनी त्यां‍च्या स्मरणार्थ प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या माध्यमातून भारतातील निवडक उदयोन्मुख चित्रकारांना शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या योगे युवा कलाकारांना त्यांच्या कला क्षेत्रातील प्रवासासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी चित्रप्रदर्शनीमधून त्यांच्या कलाकृती जगासमोर आणण्याची संधीही दिली जाते. ‌‘प्रेरणा‌’ प्रदर्शनानिमित्त प्रफुल्ला आर्ट फाउंडेशनच्या कलानंद शिष्यवृत्तीने सन्मानित चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन याच कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com