अल्पवयीन मुलीला अश्लील संदेश पाठवणाऱ्याला अटक

अल्पवयीन मुलीला अश्लील संदेश पाठवणाऱ्याला अटक

Published on

अल्पवयीन मुलीला अश्लील संदेश पाठवणाऱ्याला अटक

भाईंदर, ता.७ (बातमीदार) : लग्न मोडल्याने चिडलेल्या तरुणाने समाजमाध्यमावर बनावट अकाउंट तयार करून मिरा रोड येथील एका अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफिती व संदेश पाठविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला गुजरातमधून अटक केली आहे.

पीडितेला तिच्या मोबाइलवर नोव्हेंबरमध्ये इन्स्टाग्रामवरून अश्लील चित्रफिती व संदेश पाठविण्यात आले होते. याप्रकरणी मिरा रोड पोलिस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा समांतर तपास मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाकडून सुरू होता. याप्रकरणी ज्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अश्लील संदेश पाठविण्यात आले होते ते अकाउंट गुजरातमधील अंकलेश्वर येथे राहणाऱ्या दीप सोळंकी (वय २०) याचे असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल राख यांनी एक पथक अंकलेश्वर येथे रवाना केले. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीसोबत पीडित मुलीचे ऑक्टोबरमध्ये लग्न ठरले होते. परंतु आरोपीची वागणूक योग्य नसल्याने पीडितेच्या नातेवाइकांनी लग्न मोडल्याचे पोलिस तपासातून समोर आले. याचा राग मनात धरून आरोपीने पीडितेच्या मोबाइलवर अश्लील चित्रफिती व संदेश पाठवले.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी मिरा रोड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com