श्वानांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
श्वानांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : एका महिलेवर तीन ते चार भटक्या श्वानांनी हल्ला चढवत तिला फरफटत नेत तिच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले आहेत. टिटवाळा येथील एका गृहसंकुलाच्या परिसरात शुक्रवारी (ता.६) मध्यरात्री ही घटना घडली असून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या महिलेची प्रकृती चिंताजनक असून, तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेली महिला ६० वर्षीय असून भिक्षेकरी किंवा कचरावेचक असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त केली जात आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. टिटवाळ्यातील रिजन्सी गृहसंकुलाच्या मागील बाजूला ही घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या भागातील तीन ते चार भटके श्वान महिलेच्या अंगावर धावून गेले. चारही श्वानांनी एकाच वेळी या महिलेवर हल्ला केल्याने महिला खाली कोसळली. भटक्या श्वानांनी महिलेचे कपडे ओढून, तिच्या शरीराला चावे घेत तिला जखमी केले. या महिलेने सुरुवातीला भटक्या श्वानांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न केले; मात्र चारही श्वान तिच्यावर आक्रमकपणे हल्ला करीत असल्याने नंतर तिला उठणेदेखील शक्य झाले नाही. या हल्ल्यात गंंभीर जखमी झालेली महिला घटनास्थळीच बेशुध्द झाली. भटक्या श्वानांनी या महिलेला ओढत गृहसंकुलाच्या दिशेने नेले. जागरूक नागरिकांनी तातडीने या महिलेला रुग्णवाहिकेतून गोवेली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर गोवेली रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

