रेल्वेत नोकरीच्या प्रलोभनाने ७४ लाखांचा गंडा

रेल्वेत नोकरीच्या प्रलोभनाने ७४ लाखांचा गंडा

Published on

रेल्वेत नोकरीच्या प्रलोभनाने ७४ लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : रेल्वेत नोकरी देण्याच्या प्रलोभनाने रायगड जिल्ह्यातील रोहा येथील तरुणांची तब्बल ७४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली आहे. कल्याणमधील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रारदाराकडून कल्याणमधील एक कुटुंब व इतर व्यक्ती अशा ८ ते ९ जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी प्राथमिक तपासणी अहवाल नोंदवून घेतला आहे.

पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार जानेवारी ते मे या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. चिकणघर भागातील एका कुटुंबातील चार सदस्य, संशयास्पद तीन रेल्वे अधिकारी आणि एक वैद्यकीय अधिकारी अशा आरोपींनी ही फसवणूक केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. तक्रारदार हे रोहा येथे राहणारे असून, त्यांचा मुलगा बेरोजगार होता. आरोपींनी तक्रारदाराला रेल्वेत आमची ओळख असून, आम्ही तुमच्या मुलाला रेल्वेत नोकरी मिळवून देऊ शकतो असे प्रलोभन दाखविले. तक्रारदाराने या भामट्यांवर विश्वास ठेवत आरोपींच्या विविध बँक खात्यांत ७४ लाख ४० हजार रुपये पाठवले. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराच्या मुलाला रेल्वेत नोकरी लागल्याचे बनावट ई-मेल, नियुक्तीपत्रे पाठविले; मात्र ही नियुक्तीपत्रे बनावट असल्याचे समजताच तक्रारदाराने आरोपींकडे पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावला. त्यांच्याकडून पैसे परत मिळण्याची शक्यता नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com