तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या अटकेसाठी आरपीआयचे उपोषण
तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या अटकेसाठी आरपीआयचे उपोषण
कामोठे, ता. ७ (बातमीदार) : नवीन पनवेल येथील एका महिलेवर केलेल्या अत्याचाराप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत खांदेश्वर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आरपीआय (आठवले गट) पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
खांदेश्वर पोलिस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात बलात्कार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शुभम पवार याने २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आहे. गुन्हा दाखल होऊन २० दिवसांनंतरही पोलिसांनी यातील आरोपींना अटक केलेली नाही. पनवेल आरपीआयने सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयास पत्रव्यवहार केला होता; मात्र या कार्यालयाकडून आरोपींना अटक झाली नाही. त्यामुळे आरपीआय पनवेल महापालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, सुरेंद्र सोरटे, दिनेश जाधव या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यावर उपोषण सोडण्याची भूमिका या वेळी उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान, उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी नवीन पनवेल, खांदा कॉलनी परिसरातील आंबेडकरी समाजातील नागरिकांनी हजेरी लावली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

