पंजाबमधील भजन गायक लखविंदर सिंग यांच्यावर हल्ला
पंजाबमधील भजन गायक लखविंदर सिंग यांच्यावर हल्ला
नवी मुंबई, ता.७ (वार्ताहर) : पंजाबमधील प्रसिद्ध भजन गायक लखविंदर सुरजित सिंग यांच्यावर शुक्रवारी (ता.६) सायंकाळी ८ ते १० जणांनी कुऱ्हाड आणि लोखंडी पाईपने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात लखविंदर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी संशयित आरोपी जसपाल व हॅप्पी यांच्यासह ८ ते १० हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. २०१७ मध्ये मृत्यू झालेल्या भूपेंदरसिंग याच्या कुटुंबांला लखविंदर सिंग पाठिंबा देत असल्यामुळे या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.
लखविंदर सुरजित सिंग हे शुक्रवारी सांयकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नवी मुंबईतून मुंबई विमानतळावर टॅक्सीने जात होते. यावेळी त्यांची गाडी सायन-पनवेल मार्गावर वाशी येथील जुई खाडी पुलावर आली असताना, एका चारचाकीमधून आलेल्या हॅप्पी सिंग व यशपाल सिंग व त्याच्या ८ ते १० साथीदारांनी लखविंदर यांची गाडी अडवून त्यांना खाली उतरवले. त्यानंतर हप्पी सिंग याने त्याच्या हातातील लोखंडी पाईपने लखविंदर सिंग यांच्या हातावर मारले. तर जसपाल सिंग यांने त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला केला. यावेळी त्यांच्या साथीदारांनी देखील लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. त्यानंतर या सर्व हल्लेखोरांनी लखविंदर यांना त्याच्या गाडीतून जबरदस्तीने अज्ञात स्थळी नेले. त्यानंतर त्यांना पगडी बांधायला सांगून त्यांच्यावर पिस्टल, रिव्हॉल्वर, देशी कट्टा रोखून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मोबाईल कँमेऱ्यासमोर त्यांना बोलण्यास सांगून त्याचा व्हिडिओ बनिवला. तसेच या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली.
..
आरोपींचा शोध सुरू
आरोपींनी लखविंदर सुरजित सिंग यांना पुन्हा गाडीतुन सायन-पनवेल मार्गावर वाशी येथे आणून गाडीतून खाली ढकलून दिल्यानंतर पलायन केले. त्यानंतर जखमी लखविंदर सिंग यांनी रुग्णालय गाठले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाशी पोलिसांनी हॅप्पी सिंग व जसपाल सिंगसह त्यांच्या ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

