दोन हजार १८७ जड-अवजड वाहनांना दंड

दोन हजार १८७ जड-अवजड वाहनांना दंड
Published on

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : नवी मुंबई वाहतूक विभागाने नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या दोन हजार १८७ जड-अवजड वाहनांवर (डम्पर) दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर १० लाख ६६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गत १५ दिवसांमध्ये राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर, तसेच नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या जड-अवजड वाहनांवर (डम्पर) नियमितपणे कारवाई करण्यात येते. नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत सर्व शाखांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या दोन हजार १८७ जड-अवजड वाहनांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये कायदेशीर कारवाई केली, तसेच या वाहनांवर तब्बल १० लाख ६६ हजार ४५० रुपये इतका दंड ठोठावण्यात आला. यापुढील काळातदेखील नियमबाह्य बांधकाम साहित्याची (विटा, दगड, खडी, माती व इतर बांधकाम साहित्य) वाहतूक करणाऱ्या वाहनांवर, तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com