आरपीआय पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित

आरपीआय पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित

Published on

कामोठे ता. ११ (बातमीदार) : अन्याय होतो त्या वेळी सर्वांनी एकत्रित येऊन त्याविरोधात आवाज उठवायला पाहिजे, असे मत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केले. पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आरपीआय पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले आमरण उपोषण मुख्य आरोपींच्या अटकेनंतर रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत सोडले. या वेळी ठाकूर बोलत होते. अनुसूचित जातीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी आरपीआयचे पनवेल महानगर जिल्हा क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे, सुरेंद्र सोरटे, दिनेश जाधव यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयासमोर शनिवारपासून (ता. ७) बेमुदत उपोषण सुरू केले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दिला होता. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. दरम्यान, यातील तीनपैकी एका प्रमुख आरोपीला पोलिसांनी अटक केली. यानंतर उपोषणकर्त्यांनी रविवारी रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नारळपाणी पिऊन उपोषण स्थगित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com