जलतरणपटू आर्य जागतिक विक्रमासाठी तयार
उरण, ता. ११ (वार्ताहर) : तालुक्यातील केगाव-दांडा येथील १३ वर्षीय आर्य किशोर पाटील एका नव्या जागतिक विक्रमासाठी सज्ज झाला आहे. १८ डिसेंबरला धरमतर जेट्टी ते कासा खडक हे सागरी २४ किलोमीटरचे अंतर तो बटरफ्लाय या जलतरण प्रकारातून पोहून पार करणार आहे. यामुळे तो खुल्या समुद्रातील २४ किलोमीटरचा प्रवाह पोहून जाणारा जगातील पहिला जलतरणपटू ठरणार आहे. बटरफ्लाय हा प्रकार अत्यंत ताकदीचा आणि दमछाक करणारा प्रकार आहे. या विक्रमासाठी आर्य दररोज उरणच्या खुल्या समुद्रामध्ये तसेच नगर परिषदेच्या जलतरण तलावामध्ये सहा तासांचा सरावदेखील करत आहे. आर्य उरणच्या सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आठवीत शिकत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

