पूर्वोत्तर भारत हा अविभाज्य घटक : माधवी लता
पूर्वोत्तर भारत हा अविभाज्य घटक : माधवी लता
डॉ. विद्यानीष्ठ मराक यांना ''वन इंडिया'' पुरस्कार प्रदान
शिवडी, ता. ११ (बातमीदार) : जेव्हा समाज उत्तर-पूर्व भारताला स्वीकारतो, त्यांना प्रेमाची अनुभूती देतो, तेव्हा उत्तर पूर्व भारत वेगळा आहे. आम्हाला भारतापासून वेगळे व्हायचे आहे, हा नॅरेटिव्ह चुकीचा ठरतो, असे ''माय होम इंडिया''चे संस्थापक सुनील देवधर म्हणाले. ''माय होम इंडिया'' या संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विले पार्ले पूर्व येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विले पार्ले येथे सोमवारी (ता. ९) पार पडलेल्या ''वन इंडिया'' पुरस्कार प्रदान सोहळ्यात देवधर बोलत होते.
''वन इंडिया'' हा मानाचा पुरस्कार डॉ. विद्यानीष्ठ मराक यांना माधवी लता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी माधवी लता म्हणाल्या की, पूर्वोत्तर भारत हा अविभाज्य घटक आहे. त्याच्याशिवाय ना पुराण आहे, ना महाभारत. पूर्वोत्तर भारताशिवाय आपण भारताची कल्पनाच करू शकत नाही. प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की वर्षातून किमान एकदा आपण उत्तर-पूर्व भारताला भेट द्यायलाच हवी, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात अभिनेता मनोज जोशी, बिमल केडिया, डॉ. हरीश शेट्टी, बलदेव राज सचदेवा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार खराडे यांनी केले.
माय होम इंडिया संस्थेतर्फे ईशान्य भारतातील आदिवासी समाज आणि उर्वरित भारत यादरम्यानचे संबंध सुदृढ करण्यासाठी कार्यरत व्यक्तींना मागील १३ वर्षांपासून ''वन इंडिया'' पुरस्कार दिला जातो. या मालिकेमध्ये यंदा तुरा मेघालय येथील डॉ. मराक यांचा सन्मान केला. डॉ. मराक यांनी पारंपरिक गारो औषध पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी जीवन समर्पित केले आहे. त्यांनी स्थापन केलेल्या ''समाचिक असोसिएशन''च्या माध्यमातून गारो टेकड्यांतील अनेक गावांतील पारंपरिक वैद्यांना ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे क्षयरोग आणि मलेरियावर नियंत्रण मिळवण्यात मोठे यश आले आहे.
''माय होम इंडिया'' संस्थेचे कार्य''
''माय होम इंडिया'' ही संस्था सुनील देवधर यांनी २००५ मध्ये स्थापन केली. ही संस्था ईशान्य भारतातून देशाच्या अन्य भागांत शिक्षण-व्यवसायांसाठी जाणाऱ्या तरुणांना सर्व प्रकारची सहाय्य सेवा (हेल्पलाइन) पुरवणे, आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे (जन आरोग्य सेवा), बाल सुधार केंद्रांतील मुलांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबाशी पुन्हा जोडणे (सपनों से अपनों तक), तसेच योग्य सुनावणीअभावी तुरुंगात खितपत पडलेल्यांना कायद्याचे साह्य उपलब्ध करून देणे (दर्द से हमदर्द तक) अशा विविध उपक्रमांच्या माध्यमांतून गेल्या २० वर्षांत माय होम इंडियाचे काम देशभरातल्या सुमारे १०० शहरांमध्ये आता विस्तारले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

