सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची १६ लाखांची फसवणूक

सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची 
१६ लाखांची फसवणूक
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : सेवानिवृत्त नागरिकांसाठी दुप्पट परतावा देणाऱ्या विशेष योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला लाभ होईल, असे सांगत एकाने ज्येष्ठ नागरिकाची १६ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक हे पलावा येथे राहण्यास असून, एका व्यक्तीने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला होता. त्यांना एक लिंक पाठवून त्यामध्ये सेवानिवृत्त व्यक्तींसाठी आमच्याकडे आकर्षक गुंतवणूक योजना आहे. आपण त्या योजनेचा लाभ घेतला, तर अधिकचा परतावा मिळू शकतो. शिवाय आपण सेवानिवृत्त क्रेडिट कार्ड काढले, तर दोन लाखांपासून ते १० लाखांपर्यंत कोणत्याही क्षणी तुम्हाला ती रक्कम वापरण्यास मिळणार आहे. यासाठी आमच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे त्याने ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना गुंतवणूक योजनेची माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून त्यांचा डेबिट क्रमांक, एटीएम कोड आणि ओटीपी नंबर मागवून घेण्यात आला. ही माहिती मिळताच ज्येष्ठ नागरिकाच्या बॅंक खात्यातील १६ लाख ६१ हजार रुपये इतर खात्यावर वळते करून घेण्यात आले. अशाच पद्धतीने त्याने अन्य तीन नागरिकांचीदेखील फसवणूक केली आहे. गुंतवणूक केल्यानंतर भामट्याने त्यांच्या संपर्काला प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकाने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com