मुंबई-गोवा महामार्ग पथदिव्यांनी उजळणार

मुंबई-गोवा महामार्ग पथदिव्यांनी उजळणार

Published on

पेण, ता. ११ (वार्ताहर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे प्रदीर्घ काळानंतर चौपदरीकरण सुरू आहे. कोकणाचे प्रवेशद्वार पनवेल-पळस्पे फाटा येथून सुरू होत असून, पनवेल ते वडखळपर्यंत सिमेंट काँक्रीटचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या ठिकाणावरील पुलांवर विद्युत खांबांची उभारणी करून पथदिवे लावण्यात येत असल्याने लवकरच महामार्ग उजळणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून हजारो पर्यटक अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी, मालवण, सिंधुदुर्ग या ठिकाणी समुद्रांवर फिरण्यासाठी येतात. औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने या ठिकाणी मोठमोठे कारखाने, तसेच कंपन्या उभ्‍या राहत असल्‍याने अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. रात्रीच्या वेळी अपघातांची घटना वाढल्‍याने नागरिक, तसेच चालकांकडून पथदिवे लावण्याची मागणी होत होती. त्यानुसार जे. एम. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यमातून महामार्गाच्या पुलांवर दुतर्फा पथदिवे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पनवेल, पळस्पे, तुरमाळे, तारा, खारपाडा पूल, बाळगंगा नदीपूल, तरणखोप बायपास, भोगावती नदीपूल, पशुसंवर्धन ते रामवाडी पूल, वाशीनाका इथपर्यंत विद्युत खांबांची उभारणी करण्यात आली आहे. त्‍यामुळे लवकरच पथदिव्याने उजळणार असल्याने वाहनचालकांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना अनेक ठिकाणी खडी, वाळू, तसेच माती पडल्याने रात्रीच्या सुमारास वाहनांचे अपघात होतात. अंधारात रस्‍त्‍याचा अंदाज येत नसल्‍याने वाहने घसरतात अथवा उसळण्याचे प्रकार घडतात. आता पथदिवे लावण्यात आल्याने अपघातांचे प्रमाण कमी होईल.
- संतोष पाटील, दैनंदिन प्रवासी

मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल, पळस्पे ते वाशी नाकादरम्यान विद्युत खांब उभारणी करून दिवेही बसवण्यात आले आहेत. पंधरा दिवसांत महामार्ग उजळून निघेल. जेएसडब्ल्यू कंपनी, डोलवी, कासू, पांडापूर येथील पुलावरही लवकरच विद्युत खांब उभारण्याचे काम सुरू करून पथदिवे लावण्यात येणार आहेत.
- विश्वास म्हात्रे, इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर, जे. एम. इन्फ्रास्ट्रक्चर

पेण ः

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com