पडळकर, खोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा

पडळकर, खोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा

Published on

पडळकर, खोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली. त्यांनी खालच्या पातळीवरील टीका केल्याने त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पक्षाचे प्रवक्ते तथा मुंबई युवक अध्यक्ष ॲॅड. अमोल मातेले यांनी केली आहे. दोन्ही नेत्यांकडून अत्यंत खालच्या पातळीवरील अपमानास्पद व जातीय तेढ निर्माण करणारी विधाने केली जात आहेत. त्यामुळे केवळ एका नेत्याचा नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय संस्कृतीचा अपमान होत असल्याचा आरोप मातेले यांनी केला आहे. याबाबत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी साकीनाका पोलिस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी पक्षाचे प्रवक्ते तथा मुंबई युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, मुंबई सरचिटणीस इमरानभाई तडवी, चांदिवली तालुका अध्यक्ष ॲड. कुतुब आलम शहा, सचिव संतोष लांडे, वॉर्ड अध्यक्ष राजेंद्र ढवळे, असिफ मुजावर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com