प्रतिक्षा यादीतील ९६ जणांनी घर स्वीकारले
प्रतीक्षा यादीतील ९६ जणांनी घर स्वीकारले
स्वीकृतीसाठी १७ डिसेंबरची अखेरची मुदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकत्याच काढलेल्या लाॅटरीतील सुमारे ४४३ विजेत्यांनी घरे नाकारली होती. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने प्रतीक्षा यादीतील ४०६ जणांना विजेते जाहीर करत घर स्वीकाण्याबाबत मोबाईलवर मेसेज पाठवला होता. त्यापैकी आतापर्यंत केवळ ९६ लोकांनी घर स्वीकारत असल्याचे म्हाडाला कळवले आहे. दरम्यान, १७ डिसेंबरपर्यंत घर स्वीकारण्याची अंतिम मुदत असल्याने आणखी किती जण घरे स्वीकारणार, याकडे म्हाडाचे लक्ष लागले आहे.
म्हाडाने विधानसभा निवडणुकीच्या आधी काढलेल्या २०२० हजार घरांच्या सोडतीत विजेते ठरलेल्यांना मोबाईलवर मेसेज पाठवत १५ दिवसांत घर स्वीकारावे, असे आवाहन केले होते; मात्र जवळपास ४४३ लोकांनी घर नाकारले किंवा घर घेणार की नाही याबाबत म्हाडाला काहीच कळवले नव्हते. त्यामुळे म्हाडाने त्यांना बाद करत प्रतीक्षा यादीतील ४०६ जणांना विजेते जाहीर केले, तसेच घर स्वीकारण्याबाबतचा मेसेज नोंदणीकृत मोबाईलवर पाठवला होता.
२५ टक्के रक्कम भरावी लागणार
१५ दिवसांत त्यांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून घर स्वीकारत आहे किंवा नाही याची म्हाडाला माहिती देणे बंधनकारक आहे; मात्र सदरचा मेसेज पाठवून जवळपास नऊ दिवस झालेले आहेत; मात्र केवळ ९६ जणांनी घर स्वीकारले आहे. उर्वरित जवळपास ३०९ लोकांनी घर स्वीकारण्याबाबत काहीच कळवले नसल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, घर स्वीकारल्यानंतर विजेत्याला म्हाडाकडून तात्पुरते देकारपत्र पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील ४५ दिवसांत घराची २५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

