निसरड्या रस्त्यावर ट्रेलरचा अपघात

निसरड्या रस्त्यावर ट्रेलरचा अपघात

Published on

मनोर, ता. ११ः दुर्वेस गावाच्या हद्दीत अपघातग्रस्त ट्रेलरमधील ऑइल सांडल्याने रस्ता निसरडा झाल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद होती. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गुजरात मार्गिकेवर ही दुर्घटना झाली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील साये गावाच्या हद्दीत गुजरात वाहिनीवर कंटेनरची वाहतूक करणाऱ्या ट्रेलर क्रमांक (एमएच ४३ बी.पी. १३५२) सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघात झाला. गुजरातच्या दिशेने जाताना अनियंत्रित झालेला ट्रेलर रस्ता दुभाजकाला धडकला. या वेळी कंटेनरमधील ऑइल मुंबई मार्गिकेवर पडल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे बराच काळासाठी वाहतूक बंद होती. अखेर अपघातग्रस्त कंटेनर क्रेनच्या सहाय्याने हटवण्यात आला तसेच माती आणि रेती टाकल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com