जिल्ह्यातील सहा गाव, पाझर तलाव गाळमुक्त

जिल्ह्यातील सहा गाव, पाझर तलाव गाळमुक्त

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करताना सहा गाव व पाझर तलावांमधून तब्बल २१ हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. त्यामुळे या गाव व पाझर तलावात २१ हजार क्युबिक मीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. येत्या काही महिन्यांत आणखी ४२ तलावांतील गाळ काढण्यात येणार आहे.
ठाण्याला धरणांचा जिल्हा असे म्हटले जाते. मुंबई आणि ठाण्याची तहान भागवणारे मोठी धरणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात वर्षांनुवर्षे पाणी टंचाई आणि नापिकीच्या झळा शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावपाड्यांना सोसाव्या लागत होत्या. या परिसरात उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र, टँकरने केला जाणारा पाणीपुरवठाही पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे या गावांची तहान भागत नाही. गाळमुक्त धारण, गाळमुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाझर तलावामुळे पाणी जमिनीत जिरून भूगर्भातील पाण्याची पातळीवर येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीसह सिंचन क्षेत्रात वाढ होणे, हातपंप, कुपनलिका, कपडे धुण्यासह दैनंदिन कामांसाठी होणार आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत सहा तलावांतील गाव व पाझर तलावांतून २१ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता दिलीप जोकर यांनी दिली. त्यामुळे तितकाच पाणीसाठा निर्माण झाला असून, विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

योजनांची कामे हाती घेण्याच्या सूचना
या वर्षी उत्तम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाणी स्त्रोताचे बळकटीकरण करण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनांची कामे हाती घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यात ५० गाव तलाव आणि पाझर तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन ठिकाणी गाळ काढण्याचे कामही सुरू करण्यात आल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com