तीन दिवसापासून प्रवाशांचे हाल

तीन दिवसापासून प्रवाशांचे हाल

Published on

तीन दिवसांपासून प्रवाशांचे हाल
चेंबूर ता. ११ (बातमीदार) : कुर्ला येथील एस. जी. बर्वे मार्गावरील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळ बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिल्याने मोठा अपघात झाला. त्यामुळे या परिसरात मागील तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेस्ट बसचे नुकसान होऊ नये, यासाठी बेस्ट बस प्रशासन व वाहतूक पोलिसांनी खबरदारी म्हणून कुर्ला रेल्वे स्थानक डेपोतून सुटणाऱ्या बस मागील तीन दिवसांपासून बंद ठेवल्या आहेत.

अंधेरी, दादर, कलिना, गोरेगाव, सांताक्रूझ, मालवणी, बीकेसी, बांद्रामार्गे सुटणाऱ्या बस कुर्ला डेपोतून सोडण्यात आल्या. त्यामुळे बेस्ट प्रवाशांना मागील तीन दिवसांपासून तारेवरची कसरत करावी लागत आहे. बीकेसी, अंधेरी, कलिना व कुर्ला डेपोपर्यंत जाण्यासाठी रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. त्यामुळे काही प्रवाशांनी एलबीएस मार्गापर्यंत चालत जाणे पसंत केले. रिक्षांची कमतरता असल्याने रिक्षासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रिक्षाचालकांचा भाव वधारला होता. याचा फटका विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, चाकरमानी तसेच महिलावर्गाला बसला.

वाहतूक पोलिसांनी हा मार्ग रात्रीच मोकळा करायला हवा होता. या मार्गावरील वाहतूक बंद केल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. डेपोपर्यंत पायपीट करावी लागत आहे.
- संचित सोलकर, विद्यार्थी.

बेस्ट बस दुर्घटनेत बळी गेल्याचे मोठे दुःख आहे. या घटनेला सर्वस्व जबाबदार बेस्ट प्रशासन व वाहतूक पोलिस आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाचालक मनमानी भाडे आकारत असल्याने याचा आम्हाला फटका बसत आहे.
- समीक्षा गवळी, आयटी अभियंता

सध्या बेस्ट बसची व्यवस्था ठेकेदाराच्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे या घटना घडत आहेत. कंत्राटी पद्धतीने कमी पगारात चालक, वाहकांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे अपघात होत आहेत; मात्र अपघातानंतर आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे.
- सलीम शेख, कामगार

बेस्ट बस बंद असल्याने कॉलेजला जायला उशीर होत आहे. त्यातच रिक्षा मिळत नसल्याने चालत जावे लागत आहे. या मार्गावर लवकरात लवकर बस सुरू करायला हव्यात.
- शुभम म्हात्रे, विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com