सीमावासियांच्या दडपशाही विरोधात नाराजी

सीमावासियांच्या दडपशाही विरोधात नाराजी

Published on

सीमावासीयांच्या दडपशाहीविरोधात नाराजी
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे बसवराज होरत्ती यांना पत्र

मुंबई, ता. ११ : विधानपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमाभागातील मराठी भाषकांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. त्यासोबत कर्नाटकातील काँग्रेस सरकारने विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही नाराजी व्यक्त केली. सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत कर्नाटक विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरत्ती यांना निवेदन देत नाराजी व्यक्त केली.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कर्नाटक विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरत्ती यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक सरकार विधानसभेच्या सभागृहातून स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा विचार करीत आहे. असे झाले तर नक्कीच या देशातील प्रत्येक देशभक्त नागरिकाच्या मनात तीव्र संताप निर्माण होईल. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे आणि ते कधीही कमी करता येणार नाही. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी आणि देशाच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. ब्रिटिश साम्राज्याच्या तावडीतून देशाला मुक्त करण्यासाठी त्यांचे प्रयत्न जगभरात ओळखले जातात. विधिमंडळ हे लोकांच्या मनाचे प्रतिबिंब आणि प्रतिनिधित्व करते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पीठासीन अधिकारी या नात्याने मी लोकांच्या भावना जाणते. त्यामुळे वस्तुस्थिती आणि भावना समोर आणल्यानंतर मला खात्री आहे की तुम्ही या निर्णयावर पूर्ण विचार कराल आणि वीर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा कायम कर्नाटक विधानसभा सभागृहाच्या भिंतीवर राहील याची खात्री केली जाईल.

महाराष्ट्रातील सरकार आणि महाराष्ट्राचे विधिमंडळ हे एकमताने आणि पूर्ण शक्तीने सीमाभागातील आमच्या मराठी बांधवांच्या पाठीशी आहे. कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर अत्याचार होत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सीमाभागातील जनतेच्या शिक्षण, रोजगार, मराठी शाळा, सांस्कृतिक कार्यक्रम याबाबत जी अवहेलना होते, त्याबाबत कर्नाटक सरकारने जबाबदारी पार पाडायला हवी.
- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com