कुत्र्यांच्या हल्ल्यातील महिलेची ओळख पटली
कल्याण, ता. ११ (वार्ताहर): टिटवाळा येथे भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर जीवघेणा हल्ला केला होता. घटनेच्या पाच दिवसांनंतर बुधवारी रुग्णालयात दाखल महिला शुद्धीवर आली असून, तिची ओळखही पटली आहे.
मुंबईतील चेंबूर परिसरात कुटुंबासह राहणाऱ्या महिलेला चार भटक्या कुत्र्यांनी किमान ५० मीटरपर्यंत ओढून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. बुधवारी व्हायरल व्हिडिओनंतर मूळची नेपाळची रहिवासी असलेली चंद्राबाई धनसिंगची (६२) ओळख पटली. नेपाळवरून ट्रेनने परतत असताना चुकून टिटवाळा येथे आल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

