ठाण्यात आगीच्या दोन घटना

ठाण्यात आगीच्या दोन घटना

Published on

ठाणे, ता. १३ : शहरात काही तासांच्या अंतरात आगीच्या दोन घटना समोर आल्या होत्या. त्यापैकी एका ठिकाणी फटाक्यामुळे आग लागली असून, दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सावरकर नगरातील वसंत विहार सोसायटीतील इमारतीच्या टेरेसवर फटाक्यामुळे इलेक्ट्रिक केबलला आग लागली. शुक्रवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले, तर दुसऱ्या घटनेत कोलशेत रोडवरील आयकॉन टॉवर इमारतीच्या तळमजल्यातील रिकाम्या गोडाऊनमधील कचऱ्याला आग लागली होती. शुक्रवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. पाऊण तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com