दादर स्थानकातील ८० वर्षे जुने हनुमान मंदिराला रेल्वेकडून नोटीस

दादर स्थानकातील ८० वर्षे जुने हनुमान मंदिराला रेल्वेकडून नोटीस

Published on

दादर स्थानकातील पुरातन हनुमान मंदिराला नोटीस
सात दिवसांच्या मुदतीनंतर रेल्वे कारवाई करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १२ च्या पूर्वेकडे असलेल्या ८० वर्षे जुन्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने हटवण्याची नोटीस बजावली आहे. रेल्वेच्या सहाय्यक विभागीय अभियंता (भायखळा) यांच्या कार्यालयाकडून ही नोटीस ४ डिसेंबर रोजी जारी करण्यात आली. त्यावरून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, मंदिर हटवण्यापूर्वी विचारविनिमय करण्याची मागणी केली.
सदर हनुमान मंदिर रेल्वेच्या जागेवर अनधिकृतरीत्या बांधण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. या मंदिरामुळे प्रवासी आणि वाहनांना ये-जा करण्यात अडथळा निर्माण होत आहे. तसेच दादर स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामातही त्यामुळे व्यत्यय येत आहे. दादर स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम भारतीय रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत केले जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून मंदिर हटवण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. विहित कालावधीत मंदिर न हटवल्यास रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबत कार्यवाही केली जाईल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
----
स्थानीय नागरिकांचा विरोध
दादर स्थानकातील सदर मंदिर हे स्थानिक रहिवाशांचे श्रद्धास्थान आहे. ८० वर्षांपूर्वी बांधलेल्या या मंदिराबद्दल नागरिकांमध्ये भावनिक नाळ जोडली आहे. या नोटिशीनंतर स्थानिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काही सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांनी मंदिरासाठी आंदोलने उभारण्याचे आणि रेल्वे प्रशासनाकडे याचिका दाखल करण्याचे ठरवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com