एकतर्फी प्रेमातून हत्येचा निकाल
ठाणे, ता. १३ (वार्ताहर)ः प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील मुख्य आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा, तसेच ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
एकतर्फी प्रेमप्रकरणातून ४ ऑगस्ट, २०१८ रोजी सकाळी अकराच्या सुमारास ठाणे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्राची झाडेवर आरोपी आकाश पवारने १३ वार केले होते. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे नौपाडा पोलिसांनी आरोपीला ५ ऑगस्ट २०१८ रोजी अटक केली होती. ठाणे सत्र न्यायालयात ३१ आक्टोबर २०१८ रोजी नौपाडा पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल, साक्षीदार, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवून आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणात सरकारी वकील ए. पी. लाडवंजारी यांनी न्यायालयात भक्कम पुरावे, २१ साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्हीचे चित्रण दिले. त्यानुसार न्यायमूर्ती ए. बी. अग्रवाल यांनी गुरुवारी (ता. १२) आरोपीला दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा, तसेच ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

