कुत्रा, मांजराचा चावा बेतला जिवावर
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : दोन महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्यापाठोपाठ एका मांजरीने घेतलेल्या चाव्याकडे दुर्लक्ष करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. शुक्रवारी सकाळी कल्याण पश्चिमेला राहणाऱ्या या तरुणाचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला.
कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्कमध्ये राहणाऱ्या शुभम चौधरीला (२७) दोन महिन्यांपूर्वी एक भटका कुत्रा आणि मांजराने चावा घेतला होता; पण उपचारांकडे दुर्लक्ष केल्याने १० डिसेंबरला शुभमची प्रकृती अचानक बिघडली होती. सुरुवातीला कल्याणमधील खासगी रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले. त्यानंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्याला हलवण्यात आले; पण प्रकृती बिघडतच असल्याने अखेर मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डिप्लोमा केलेला शुभम नोकरीच्या शोधात होता; पण निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

