ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण

ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण
Published on

ठाणे, ता. १६ : शिंदे सरकार असताना ठाणे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. पण फडणवीस यांच्या सरकारमध्ये गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने ठाण जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी तगडी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे संख्याबळाच्या जोरावर पालकमंत्र्याची माळ भाजपचे गणेश नाईक यांच्या गळ्यात पडणार की शिंदे यांची निवड होणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
राज्यातील फडणवीस सरकारमध्ये ठाणे जिल्ह्याच्या वाट्याला तीन मंत्रिपदे आली आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून शिंदे यांच्यासोबतच प्रताप सरनाईक तर भाजपकडून गणेश नाईक यांना संधी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी करीत सत्ता स्थापन केली. त्याकाळात एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी होते. पण २०२१ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उगारत भाजपला साथ देत महायुतीचे सरकार स्थापन केले. राज्याचे मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद विश्वासू सहकारी शंभूराज देसाई यांच्याकडे दिली होती. पण आता परिस्थिती बदललेली आहे. फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे सहभागी झाले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात दोन मंत्री पदे जिल्ह्याला मिळाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक संख्याबळ असलेले भाजपकडून पालकमंत्री पदावर दावा केली जाण्याची शक्यता आहे.
----------------------------------
नाईक, शिंदे यांच्यात संघर्ष
ठाणे लोकसभा मतदार संघातून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक भाजपकडून इच्छुक होते. मात्र, त्यावेळी शिवसेनेने ठाणे लोकसभेवर दावा करीत, शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाईक यांनी शिंदे विरोधात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विधानसभेत महायुतीचा असताना एरोली मतदार संघातून गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे महेश चौघुले उभे ठाकले होते. शिंदेकडून चौघुलेंवर कोणतीच कारवाई झाली नसल्याने नाईक आणि शिंदे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे.
--------------------------
भाजपचे नऊ आमदार
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघापैकी १५ मतदार संघात महायुतीचे आमदार आहेत. त्यापैकी भाजपचे ९ तर, शिवसेना शिंदे गटाचे ६ आमदारांचा समावेश आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व आहे. असे असले तरी, यंदाच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ९ आमदार निवडून आले आहेत. ज्या पक्षाचे उमेदवार जास्त त्याच्याकडे पालकमंत्री आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com