धूमस्टाईलने दुचाकी चालविणाऱ्या १५० चालकांवर कारवाई

धूमस्टाईलने दुचाकी चालविणाऱ्या १५० चालकांवर कारवाई
Published on

धूमस्टाइल दुचाकीस्वारांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : अतिवेगाने तसेच एका दुचाकीवर तीन ते चार लोक बसून दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे १५० हून अधिक जणांवर ही दंडात्मक कारवाई केली आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात रात्री दहा ते मध्यरात्री अगदी एक ते दोनच्या सुमारास काही तरुण मंडळी दुचाकी रस्त्यावर धूमस्टाइलने चालवतात. डोंबिवलीमधील टंडन रोड, सावरकर रोड, ठाकुर्लीतील ९० फिट रोड, कल्याण पूर्वेतील १०० फुटी रस्ता, कल्याण पूर्व पुणे जोड रस्ता, गांधारे पूल ते पडघा रस्ता, टिटवाळा ते वाडेघर बाह्यवळण रस्ता, मोठागाव माणकोली रस्ता, फडके रस्ता या भागात सुसाट वेगाने दुचाकी चालवतात. कर्णकर्कश आवाज काढले जातात. रात्रीच्या वेळेत हे प्रकार घडत असल्याने शांततेचा भंग होतो. नागरिकांची झोपमोड होते. लहान बाळ, वृद्ध, रुग्णांना या मोठ्या आवाजाचा सर्वाधिक त्रास होतो.

कल्याण-डोंबिवली शहरात रात्रीच्या वेळेत अतिवेगवान दुचाकीस्वारांचा उपद्रव असल्याने पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी अशा वाहनचालकांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश स्थानिक पोलिस ठाण्यांना दिले आहेत. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत स्थानिक पोलिसांनी शहराच्या विविध भागांत रात्रीच्या वेळेत अतिवेगाने दुचाकी चालविणाऱ्या १५० तरुण चालकांवर कारवाई केली. अशा चालकांना पकडून १०० उठाबशा आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईनंतर पुन्हा दुचाकीस्वार असे कृत्य करताना आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याची तंबी दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com