महाकीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा

महाकीर्तन महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा
Published on

महाकीर्तन महोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा
प्रभादेवी, ता. ७ (बातमीदार) : महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. अशा या संतांच्या नगरीत कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप लावून आयोजित केलेल्या महाकीर्तन महोत्सवात परळवासीय दंग झाले. सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना परळ येथील स्नेहल क्रीडा मंडळाच्या ४९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत परळ येथील अष्टविनायक बिल्डिंगच्या आवारात महाकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूरचे हभप भरत वाजे, अलिबागकर महाराज व हभप अनंत लिंगायत महाराज यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या वेळी ज्ञानेश्वर झुजम, शैलेश खापरे, प्रदीप खताते, मनोहर खापरे, पंकज चव्हाण, शरद फाटक, निमिता पंदेरे, स्नेहा बाणे, स्नेहल साळवी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com