

सामाजिक सलोखा जपणे गरजेचे
राम नाईक यांचे प्रतिपादन
विरार, ता. ७ (बातमीदार) : वसईतील दहशतवाद मुळापासून उखडण्याची प्रक्रिया मताधिकाराद्वारे परिवर्तन करून सुरुवात झाली आहे.
आता पुढची जबाबदारी नवनिर्वाचित आमदारांवर असल्याचे मत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल पद्मभूषण राम नाईक यांनी व्यक्त केले. उमराळे येथे आयोजित केलेल्या सामवेदी ब्राह्मण समाजाच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. सामवदी ब्राह्मण समाज संस्थेचे अध्यक्ष अनंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये खासदार डॉ. हेमंत सवरा, बबनशेठ नाईक, नागरहळी गुरुजी, बिशप थाॅमस डिसोजा उपस्थित होते.
राम नाईक यांनी सांगितले की, बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमास संरक्षण मिळवून देऊन आस्था जपणे, सर्वधर्मीय सलोखा टिकवणे, सर्व समाजांना समान न्याय, विशेषतः आगरी-कोळी, आदिवासी समाजबांधवांचा न्याय मिळवून देणे, तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे यासाठी काम करीत राहिले पाहिजे. या वेळी आमदार राजन नाईक यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खासदार डॉ. हेमंत सवरा, बबनशेठ नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी नागरहळी गुरुजी, बिशप थाॅमस डिसोजा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत पाटील यांनी तर सूत्रसंचालन सत्यवान पाटील यांनी केले. आभार राजेश नाईक यांनी मानले.
---------------------------
MUM25E74745
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.