रायगडमधील शिक्षकांची क्रीडा स्पर्धा उत्‍साहात

रायगडमधील शिक्षकांची क्रीडा स्पर्धा उत्‍साहात
Published on

रायगडमधील शिक्षकांची क्रीडा स्पर्धा उत्‍साहात
कर्जत, ता. ७ (बातमीदार) ः कर्जत तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पहिल्या शिक्षक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तालुक्यातील २८० जिल्हा परिषद शाळांमधील गुरुजी तथा शिक्षकांनी सहभाग घेतला आहे. याचे उद्‌घाटन जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सुनील भोपळे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले.
या वेळी तालुक्‍यातील ३३० हून अधिक शिक्षकांनी कबड्डी, लगोरी, धावणे, गोळाफेक, थाळीफेक अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला. गटशिक्षण अधिकारी संतोष डौंड यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडली. त्यांनी शिक्षकांच्या शारीरिक क्षमता वाढीसाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे सांगितले. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी पुढील वर्षी रायगड जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचे आश्वासन दिले, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या सहकार्याने शिक्षकांसाठी अधिक उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कर्जत तालुका शिक्षक क्रीडा स्पर्धेची संकल्पना मांडणारे कर्जत तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड, तसेच शिक्षण विभागाचे बीट विस्तार अधिकारी अरुण पारधी, देविदास जाधव, तालुका समन्वयक किशोर पाटील, समीर येरुनकर, पेण शिक्षक पतपेढी अध्यक्ष गजानन घरत आदी उपस्थित होते. या शिक्षक क्रीडा स्पर्धेसाठी परीक्षक भाकरीपाडा शाळेचे शिक्षक यशवंत वाघरे, तसेच राष्ट्रीय पंच नेरळ विद्या मंदिरचे जयवंत पारधी, स्वप्नील नामदास, विशाल राठोड, नेरळ विद्या विकासचे नितीन सुपे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com