एचएमपीव्ही व्हायरसला घाबरू नका

एचएमपीव्ही व्हायरसला घाबरू नका
Published on

पनवेल, ता. ६ (बातमीदार) : चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या एचएमपीव्ही या व्हायरसच्या अनुषंगाने भारतातही एक रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झाले असून, पनवेल महापालिकेच्या वतीने योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
सध्या चीनमध्ये मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) याचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. एचएमपीव्ही हे तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये २००१ मध्ये आढळला होता. एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्‍भवतो.

--------------
चीनमधून आलेला नवीन विषाणू एचएमपीव्हीबाबत चिंतेचे कारण नसल्याचे राज्य सरकारच्या अहवालात सांगण्यात आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
- मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल पालका

------------
हे करा
१. खोकला किंवा शिंक येत असेल तेव्हा तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
२. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
३. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
४. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
५. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.

---------------
हे करू नये
१. हस्तांदोलन
२. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
३. आजारी लोकांशी जवळचा संपर्क
४. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
५. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
६. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com