

पदपथावरील अतिक्रमण हटवले
घाटकोपरमध्ये पालिकेची कारवाई
घाटकोपर, ता. ६ ( बातमीदार) कुर्ल्यात ९ डिसेंबर रोजी रात्री संजय मोरे यांचे बेस्ट बसवरील नियंत्रण सुटले आणि सात जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर १५ दिवसांत घाटकोपरच्या चिराग नगर मार्केटमध्ये भरधाव टेम्पो रस्त्यावर भरगर्दीत घुसून पाच जण चिरडले. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या घाटकोपर एन विभाग कार्यालयाने पदपथावरील अतिक्रमणे हटविण्याची धडक कारवाई आज (ता. ७) केली.
पालिकेचे सहाय्यक अभियंता आनंद पांचाळ यांनी सहाय्यक पालिका आयुक्त गजानन बल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. यात चिरागनगर मार्केट परिसरात कारवाई करून पदपथावर केलेली अनेक अतिक्रमणे हटविण्यात आली. चिराग नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, उर्वरित कारवाई घाटकोपर पूर्वेकडील भागातही होणार असल्याची माहिती सहाय्यक पालिका आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी दिली.
कुर्ला आणि घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर पालिकेकडून पदपथावरील कारवाईला जोर आला आहे. घाटकोपर परिसरात करण्यात आलेल्या या कारवाई जवळपास ५० पेक्षा अधिक अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत, तर घाटकोपर पूर्वेकडील भागात ही अनेक ठिकाणी अशी अतिक्रमणे करण्यात आलेली आहेत. त्यावरही उद्या (ता. ८) कारवाई केली जाणार आहे.
पूर्व भागात पदपथ गिळंकृत
घाटकोपर पूर्व भागातील अनेक ठिकाणी पदपथ गिळंकृत करण्यात आले आहेत. त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता तरी ही अतिक्रमणे हटविली जातील का, असा सवाल पादचाऱ्यानी केला आहे. येथील नीलयोग मॉल ते बालाजी हॉटेल, तसेच प्रकाश साडी सेंटर दरम्यान पदपथ गिळंकृत करण्यात आले आहेत. काही ठिकाणी साखळ्या बांधून आणि लोखंडी खांब उभे करून रस्ते बंद केल्याचे पादचाऱ्यांचे आरोप आहेत. त्यावरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.