भिवंडीत ११० ग्रॅम एमडी जप्त

भिवंडीत ११० ग्रॅम एमडी जप्त
Published on

भिवंडीत ११० ग्रॅम एमडी जप्त
भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : भिवंडीत वागळे इस्टेट ठाणे गुन्हे शाखा विभागाने ११० ग्रॅम वजनाचा ११ लाख २२ हजार २०० रुपयांचा एमडी अमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. अहमद शकील अहमद मलीक उर्फ सोनू (वय ३९) असे आरोपीचे नाव आहे. तो समदनगर, कणेरी येथे राहणारा आहे. वागळे इस्टेट ठाणे येथील गुन्हे शाखेच्या पथकाला भिवंडीतील विशाल लॉज या ठिकाणी एमडी घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून अहमद शकील अहमद मलीक उर्फ सोनू यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ हा मुद्देमाल आढळून आला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून अहमद शकील मलीक यास अटक केली आहे, तर फरार रवीशचा शोध वागळे इस्टेट ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com