वज्रेश्वरीत उद्योजकता जागृती कार्यक्रम

वज्रेश्वरीत उद्योजकता जागृती कार्यक्रम
Published on

वज्रेश्वरीत उद्योजकता जागृती कार्यक्रम
वज्रेश्वरी ता. ७ (बातमीदार) : प्रसाद चिकित्सा धर्मादाय संस्था, गणेशपुरीमार्फत कृषी विभाग वसई व पंचायत समितीच्या साह्याने शेतकरी व बचत गटातील महिलांसाठी अंबोडे येथे नुकतेच उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी व महिलांमध्ये उद्योगाची आवड निर्माण व्हावी, शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग व नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित उद्योग निर्माण होण्यासाठी प्रसाद चिकित्सा विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. आंबोडे येथे कृषी विभाग व पंचायत समिती वसईच्या साह्याने शेतकरी व गटातील महिलांसाठी उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक नामदेव पाटील यांनी प्रक्रिया उद्योग कसे करायचे, शासकीय योजना आणि बाजारपेठ यावर सखोल असे मार्गदर्शन केले, तसेच कृषी अधिकारी रोहन संखे यांनी शेतीपूरक व्यवसाय, रोजगार हमी योजनेबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी एकूण ४० शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com