

बोरिवलीतील व्यावसायिकाच्या घरी घरफोडी
चार तासांत २३ लाखांचा मुद्देमाल पळविला
अंधेरी, ता. ७ (बातमीदार) ः बोरिवलीतील एका व्यावसायिकाच्या घरात अज्ञात व्यक्तींनी प्रवेश करून सुमारे २३ लाखांचे विविध सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी असा मुद्देमाल चोरी करून पलायन केले. मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी शनिवारी (ता. ४) सायंकाळी सात वाजता गेलेले व्यावसायिक कुटुंबीय रात्री एक वाजता घरी येईपर्यंत चोरट्यांनी संपूर्ण घरातील सफाई केली होती. अवघ्या चार तासांत सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरू केला आहे.
बोरिवलीतील विजय सेल्समागील हरि ओम अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या अपार्टमेंटच्या रूम क्रमांक ६०३ मध्ये हेमल योगेश भट हे व्यावसायिक आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांची स्वतःची प्रिटींग प्रेस आहे. घरात लग्नकार्य असल्याने काही दिवसांपूर्वीच त्यांनी बँकेच्या लॉकरमधून काही सोन्याचे दागिने आणले होते. ते दागिने त्यांनी बेडरूमच्या कपाटात सुरक्षित ठेवले होते. शनिवारी त्यांच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस होता. त्यामुळे भट कुटुंबीय अंधेरी येथे जेवणासह पार्टीसाठी गेले होते.
सायंकाळी सात वाजता घरातून गेल्यानंतर ते रात्री उशिरा एक वाजता घरी आले होते. हीच संधी साधून त्यांच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने प्रवेश केला होता. या चोरट्यांनी कपाटातील विविध सोन्याचे दागिने, सोन्याचे कॉईन, दीड किलो चांदीची भांडी असा सुमारे २३ लाखांचा मुद्देमाल चोरी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.