

दिव्यांग संघटनेची गांधीगिरी
पालिका अधिकाऱ्यांना गुलाबासह दिले निवेदन
कळवा, ता. ७ (बातमीदार) ः मागील अनेक दिवसांपासून सातत्याने मागणीपत्र देऊनही ठाणे पालिका अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होत नसल्याने त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय दिव्यांग सेनेचे निमंत्रक मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुक खान यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी केली. पालिका उपायुक्त अनघा कदम, समाजकल्याणचे दयानंद गुंडप आणि दशरथ वाघमारे यांना गुलाब फूल आणि १७ मागण्यांचे निवेदन दिले. या मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताकदिनी आंदोलनाचा इशाराही दिला.
ठाणे शहरातील दिव्यांगांनी व्यावसायिक स्टाॅलसाठी अर्ज केले आहेत; मात्र त्यांना अद्याप स्टाॅल/टपरी, गाळे उपलब्ध करून दिले नसल्याचे म्हटले. गेल्या काही वर्षांत मुंब्रा, कौसा, दिवा, कळवा आणि इतर प्रभाग समितीत अनधिकृत बांधकामांची संख्या वाढली आहे. अनधिकृत बांधकामांवर आणि मुंब्रा येथे भररस्त्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याबाबत उच्च न्यायालयाचे आदेश आणि विधानसभेत कारवाईबाबत स्थानिक आमदारांनी मुद्दा उचलून दबाव निर्माण झाल्यास मुंब्रा आणि इतर प्रभाग समितीचे अधिकारी फक्त आणि फक्त दिव्यांगांना लक्ष्य करीत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
पालिकेकडून नवीन दिव्यांग स्टाॅल मंजूर झालेले नाहीत, त्यामुळे जे दिव्यांग स्टाॅल लावत आहेत त्यांच्यावर कारवाई करू नये, ज्या दिव्यांगांच्या स्टाॅलवर कारवाई केली आहे त्यांना स्टाॅल परत करावेत. लवकरात लवकर दिव्यांगांना नवीन स्टाॅल देण्यात यावेत. दिव्यांगांचे अनुदान ठाणे महानगरपालिकेने वाटप करावे, अशा मागण्यांचे निवेदन मंगळवारी देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.