एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क

एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क
Published on

एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क
ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासन सज्ज
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : भारतात नव्या एचएमपीव्ही व्हायरसचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणादेखील अलर्ट मोडवर आली आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातदेखील या आजराशी दोन हात करण्यासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. जिल्ह्यात या आजाराचे रुग्ण आढळून आले नसले तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून २० बेड्सचे विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहे. या कक्षात औषधांच्या साठ्यासह ऑक्सिजनदेखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

चीनमधील ह्युंमन मेटान्यूमोनिया व्हायरसचा (एचएमपीव्ही) धोका लक्षात घेता, राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सर्तक झाली आहे. एचएमपीव्ही या आजाराने चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. लहान बालकांना व ६५ वर्षांवरील नागरिकांचा याचा संसर्ग लवकर होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी व त्याबाबतची काळजी घेण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयात २० बेड्सच्या विशेष कक्षाची उभारणी केली आहे. या कक्षात आजाराचा फैलाव रोखण्यासाठी पुरेसा औषध साठा, डॉक्टरांसह इतर पथकेदेखील सज्ज झाली आहेत. या रोगात सर्दी, ताप, खोकला येणे अशी साधारणत: लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात. त्याचप्रमाणे न्यूमोनियाचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून तपासणी करण्यात यावी, अशा सूचना केंद्राच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात २० बेड्सचे विशेष कक्ष उभारले आहे, तसेच आणखी १०० बेड्सचे कक्ष उभारण्याचे काम सुरू आहे. औषधांसह ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक

कळवा येथील ठाणे महापलिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकूण १९ बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यातील १५ ऑक्सिजन, दोन व्हेंटिलेटर, तर चार आयसीयूचे बेड असणार आहेत, तसेच डॉक्टर आणि परिचारिका यांचे पथकही तयार ठेवण्यात आले आहेत.
- डॉ. अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com