उल्हासनगर रेल्वे परिसर चकाचक

उल्हासनगर रेल्वे परिसर चकाचक
Published on

अनधिकृत पार्किंग, दुकानांवर पोलिस, पालिकेची कारवाई
एक लाखाचा दंड वसूल
उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) ः रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील अनधिकृत पार्किंग आणि दुकानांवर उल्हासनगर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. तसेच, एक लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पश्चिम दिशेला उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच स्कायवॉकच्या खाली अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यावर गॉगल, पट्टे, टोप्या आदी वस्तू विकणाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजय साबळे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजय पोवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील, प्रभाग समिती तीनच्या सहाय्यक आयुक्त सलोनी निवकर, मालमत्ता व्यवस्थापक मधुरा केणी यांनी स्कायवॉकखालील अतिक्रमणावर कारवाई केली. तब्बल दोनशे दुचाकींवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपयेप्रमाणे एकूण एक लाख रुपयांचा दंड वसूल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com