सहकारी भात गिरणी केंद्रावर भात खरेदीला प्रतिसाद

सहकारी भात गिरणी केंद्रावर भात खरेदीला प्रतिसाद
Published on

सहकारी भात गिरणी केंद्रावर भात खरेदीला प्रतिसाद
कामोठे, ता. ७ (बातमीदार) : पनवेल तालुका सहकारी भात गिरणी केंद्रावर भात खरेदीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७, ८०० क्विंटल भात खरेदी झाली आहे. यावर्षी शेतकऱ्याच्या भाताला प्रति क्विंटल २,३०० रुपये दर दिला जात आहे.
पनवेल तालुक्यातील नेरे, वांगणीतर्फे वाजे, कर्नाळा, शिरढोण या विभागात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. जया, सुवर्णा आणि कोलम जातीच्या भाताची लागवड केली जाते. औद्योगिकीकरणामुळे पिकत्या जमिनी सरकारी, तसेच खासगी प्रकल्पाकरिता संपादित झाल्याने भातशेतीचे प्रमाण घटले आहे. शहरीकरणामुळे जमिनीचे भाव वाढू लागल्याने अनेक शेतकऱ्यांचा जमीन विक्रीकडे कल वाढत आहे. दरम्यान, एकेकाळी भाताचे कोठार म्हणून पनवेलची ओळख होती. यंदाच्या हंगामात ३१ जानेवारी २०२५ पर्यंत भात खरेदी केली जाणार असून, सर्वसाधारण २,३०० रुपये प्रति क्विंटल भाताला दर दिला जात आहे. भात गिरणी केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने नोंद करून शेतकऱ्यांकडून भात खरेदी प्रक्रिया होत असल्याची माहिती सहकारी भात गिरणी केंद्राचे चेअरमन रवींद्र पाटील यांनी दिली. २०२३ या वर्षात तालुक्यात सुमारे २४, ३३६ क्विंटल भाताचे उत्पादन झाले होते. २०२२ मध्ये हेच उत्पन्न सुमारे ३१ हजार क्विंटल इतके होते. यावर्षी भाताचे उत्पन्न अपेक्षानुसार होईल, असे पाटील यांनी सांगितले आहे.
.....................
पनवेल तसेच उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०२२ मध्ये खरीप हंगामात २,०८८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली. त्यापैकी १,६९२ शेतकऱ्यांनी ३१, ३५१.७० क्विंटल भात दिला होता. २०२३ मध्ये खरीप हंगामात १,६२९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंद करून रजिस्टर १, ५१८ शेतकऱ्यांनी २४, ३३६. ८० क्विंटल भात दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com